Friday, June 25, 2010

शहाजीराजे भोसले


शहाजीराजे भोसले हे एक कर्तबगार सेनापती होती, शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते, राजदरबारी नॊक्ररी असतानाही शहाजीनी तटस्थ भुमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वराज्य स्थापनेला पाठिंबा दर्शवला.शहाजी मुस्तद्दी होते.विजापुरच्या बादशहाला ते शिवबाबद्दल असे सांगत की ’पोरगा माझे ऎकत नाही तुम्ही काय तो बदोबस्त करावा’ यावरुन शहाजीची ना उत्तेजन ना विरोध अशी भुमिका दिसुन येते. शहाजी राजाना स्व:ताचे राज्य व्हावे अशी मनापासुन ईच्छा होती परंतु तेवढी कुवत त्यांच्यात निर्माण झाली नव्हती. शहाजीच्या स्वराज्य स्थापनेची ईच्छा जिजाऊनी शिवाजीच्या रुपानी साकार केले. जिजाऊनीं लहानपणा पासुनच शिवाजीवर योग्य संस्कार करुन शिवकल्याण राजा घडविला.मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला २ मार्च १५९५ ला पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव शहाजी ठेवण्यात आले.पुढे १५९७ला दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ़जी ठेवण्यात आले.मालोजी राजे व फ़लटणचे लखुजी जाधव यांच्या गाढ मॆत्री होती. त्यामुळे लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ व मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे यांचा विवाह संपन्न झाला.शहाजी राजे भोसले व जाधव राव यांची कन्या जिजाबाई जा उभयांताचे लग्न इ स १६०५ मार्गशीष शुद्ध ५ शके १५२७, विस्ववासु नम संवत्सर फसली सन १०१५ या साली झाले.लग्नानंतर ५ वर्षानी मालोजी राजाचे इंदापुर नजीक रणभुमी वर देहवसान झाले.शहाजींना तीन राण्या होत्या.जिजाबाई,तुकाबाई,नारसाबाई अशी त्यांची नावे होती.जिजाऊच्या पोटी संभाजी व शिवाजींनी जन्म घेतला.तर तुकाबाईच्या पोटी व्यंकोजीनीं जन्म घेतला.व्यंकोजीना शहाजीनी बेगलॊरच्या जहागिरीवर पाठवले तर शिवाजींना पुण्याच्या जहागिरीत ठेवले.शिवाजींच्या मोठ्या बंधुचे नाव संभाजी होते त्याला शहाजीनी स्वत:जवळ ठेवले. पुण्याच्या जहागिरीत कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये म्हणुन जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी राज्यकारभारासाठी पाठवले होते. व राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. अशा प्रकारे स्वराज्य स्थापनेस अनुकुल परिस्थिती शहाजीराजानी करुन दिली।
अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर १६३९ साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.शहाजीराजे हे शुर सेनानी होते निजामशाहीत त्यांचे फ़ार वर्चस्व होते. शहाजीराजे स्वत: राजे बनु शकत होते परंतु तेवढी प्रबळता त्यांच्यात आली नव्ह्ती ही पुढील उदाहरणावरुन दिसुन येते,जेव्हा शहाजहान आणि मंहमद अदिलशहा यांनी निजामशाही संपवली त्यावेळी शहाजीनी निजामचा वारस असलेल्या मुर्तीझाला राजे केले. अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर ही घटना घडली.मुर्तीझाचे वय लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी ही शहाजी राज्यावर होती शहाजीनी तो राज्यकारभार पुढे ३ वर्षे चालवलाशहाजी हे राजकारणी पुरुष होते.विजापुरच्या पदरी असताना शहाजी राजांनी अनेक मोठमोठे विजय मिळवुन दिले.परंतु मराठा सरदारामधील हेवेदाव्यामुळे विजापुर दरबारात त्यांचा स्थांनास व प्रतिष्ठेत नेहमी चढऊतार होत असे.मुधोळच्या घोरपड्यांनी विजापुरच्या बादशहाचा गॆरसमज करुन दिला. आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, १६४८ चा. विजापुरच्या बादशहाने शहाजीना भिंतीत चिणुन मारण्यांची शिक्षा फ़र्मावली.पंरतु शिवाजी महाराजांनी दिल्ली च्या शहाजहानला पत्र पाठवुन विजापुरच्या बादशहावर दबाव आणला व शहाजीची सुटका करुन घेतली.शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. १६२५ ते १६२८ - आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९ - निजामशाहीइ. स. १६३० ते १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६ - निजामशाही
इ।स. १६३६ पासून पुढे - आदिलशाही
पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला,

No comments:

Post a Comment