Sunday, July 4, 2010

कान्होजी आंग्रे



कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये झाला . तुकोजी संकपाळ व विमाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगारा धुपर्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई ( मथुराबाईकडून) त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्यानाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगीझाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.


छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचाकिल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनीसिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराममहाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंतत्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचकप्रस्थापित केला.कान्होजी पुढे समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखले जाऊ लागलेकान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनीआंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले.


इ.स. १७०० मध्ये राणीताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठीताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावालागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणेकारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारागादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरीभागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते.



१६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ताकान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचाप्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीहीत्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीनेअगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिकशस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्गयेथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातीलमंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपतीशिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूरसरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक !




आज त्या शुरविराच्या निर्वानाचा दिवस दिनांक; ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.


आशा या थोर पुरुषास मानाचा मुजरा !!


कान्होजी आंग्रे यांची मुद्रा -
"शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी
सरखेलस्य मुद्री येकम विराजते"



" जय भवानी!!......जय शिवराय!! "