Tuesday, June 22, 2010

थोड़े आमचे विचार !!


खरच आपण ६ सोनेरी पाने वाचली पाहिजेत !
त्याचा अल्पसा आढावा आमच्या दृष्टी क्षेपातुन !!




सावरकरांचा `सहा सोनेरी पाने' हा ग्रंथ प्रत्येक हिंदूने वाचावा, असा आहे. गेल्या २ हजार ५०० वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास सावरकरांनी त्यात ग्रंथित केला आहे. हिंदुराष्ट्राची निर्मिती करू इच्छिणार्‍या सर्वांनीच एकदा तरी हा ग्रंथ वाचून काढावा. मुसलमानांची देशबाह्य निष्ठा, हा जगातील सर्व देशांचाच सध्या चिंतेचा विषय झाला आहे. १५ व्या शतकातही हा प्रश्‍न होता. `मुस्लिमांनी पादाक्रांत केलेला स्पेन निर्मुस्लिम कसा झाला ?' या उपशीर्षकाखाली या ग्रंथात सावरकर लिहितात, ``अनेक वर्षांच्या लढायांनंतर शेवटी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात स्पॅनिश िख्र्त्यासंनी मुसलमानी राजसत्तेचा पुरा मोड करून टाकला; परंतु हिंदुस्थानाप्रमाणेच स्पेनमध्येही मुसलमानांच्या हातून जरी राजसत्ता छिनावली गेली होती, तरीही मुसलमानांनी बाटवलेल्या अगणित स्पॅनिश िख्र्त्यासंवर आणि त्यांच्या वसतीखाली असलेल्या भूक्षेत्रावर मुसलमानांनी जी इस्लामी धर्मसत्ता स्थापलेली होती ती तशीच अबाधित राहिली होती. इतकेच नव्हे, तर स्पॅनिश राष्ट्राला पुढे-मागे दुभंगून टाकण्यासही कारणीभूत होण्याइतकी ती स्फोटक नि भयावह होती. हे संकट ज्यांना डोळयांपुढे धडधडीत दिसत होते आणि मुसलमानांनी पूर्वी केलेल्या धार्मिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड घेण्यासाठी जे नेहमीच टपलेले असत, त्या स्पॅनिश िख्र्त्यासंनी मुसलमानी राजसत्तेप्रमाणेच वरील मुसलमानी धर्मसत्तेलाही धुळीला मिळवण्याचा निर्धार केला.'' ``स्वतंत्र झालेल्या स्पेनच्या राज्यशासनाने एक निश्चित अवधी ठरवून दिला आणि सार्‍या राज्यभर घोषणा करवली की, या अवधीच्या आत झाडून सार्‍या मुसलमान स्त्री-पुरुषांनी एकतर आपण होऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतर त्यांनी त्या अवधीमध्ये सहकुटुंब सहपरिवार देशाच्या बाहेर नित्याचे निघून गेले पाहिजे; पण जे कोणी मुसलमान त्या अवधीत ख्रिस्तीही होणार नाहीत किंवा देशही सोडणार नाहीत त्या सर्व मुसलमान स्त्री-पुरुषांचा एकजात शिरच्छेद करण्यात येईल !!'' सावरकर पुढे लिहितात ``काय म्हणता ? कोण घोर ही ख्रिस्ती राजाज्ञा ? होय ! पण हेही ध्यानात ठेवा की, स्पेनला जेव्हा मुसलमानांनी जिंकले तेव्हा त्यांनी याहूनही अघोर असे अत्याचार ख्रिस्ती जनतेवर तेथे बळाने धर्मांतर घडवून आणण्यासाठी केलेले होते. त्या वेळी ख्रिस्ती रक्‍ताचे पाट मार्गोमार्गी मुसलमानांनी वाहवले होते. आज मुसलमानी रक्‍ताचे पाट मार्गोमार्गी ख्रिस्ती वाहवणार होते. वर दिलेला अवधी संपताच स्पॅनिश िख्र्त्यासंनी ठिकठिकाणी उठाव करून स्पेनमध्ये उरलेल्या मुसलमानांचे, त्या इस्लामी स्त्री-पुरुषांचे, आबाल-वृद्धांचे सरसकट शिरकाण केले. मुसलमान रक्‍तात न्हाऊन स्पेनचे ख्रिस्ती चर्च `शुद्ध' झाले ! स्पेन निर्मुस्लिम झाले म्हणून स्पेन `स्पेन' राहिले ! त्याचे `मोरक्को' झाले नाही !''

केरळमधील सुप्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात अहिंदूंना प्रवेश देण्यासाठी भाजप प्रयत्‍न करणार असल्याचे भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष श्री. पी.के. कृष्णादास यांनी नुकतेच सांगितले आहे. भाजप अल्पसंख्यांकांच्या विशेषत: मुसलमानांच्या विरोधात आहे, ही भाजपची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी सदर भूमिका भाजपतर्फे घेण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. भाजपच्या या भूमिकेला रा.स्व. संघाचे प्रांत कार्यवाह श्री. के.आर्. मोहन यांचा पाठिंबा आहे. या पार्श्‍वभूमीवर सावरकरांची अहिंदूंना मंदिरात प्रवेश देण्यासंबंधीची मते आजही सर्वांना उद्बोधक आहेत. १९५८ साली पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आचार्य विनोबा भावे यांनी अहिंदूंना सोबत घेऊन अट्टाहासाने प्रवेश केला. याबाबत सावरकरांनी त्याच वर्षीच्या `नवाकाळ'च्या दिवाळी अंकात `हिंदूंच्या देवळात अहिंदूंना प्रवेशाचा अधिकार नाही !', असा एक लेख लिहिला. ते लिहितात, ``या `जयजगत' मंडळींच्या या वेडपट मागणीस अनुसरून जर हिंदूंनी आपली मोठमोठी देवस्थाने अहिंदूंना, विशेषत: सर्व मुसलमानांना सताड उघडी करून दिली, तर तसा प्रवेशाचा अधिकार मिळताच जे शेकडो मुसलमान त्या हिंदु देवालयात शिरतील, ते मानव म्हणून नव्हेत, तर मुसलमान म्हणूनच शिरतील. त्या देवालयातील मूर्तीस हात जोडण्यासाठी नव्हे, तर तिला हातोड्याने फोडण्याची पहिली संधी केव्हा मिळते ते साधण्यासाठी ! हिंदूंच्या देवालयातील मूर्ती पहाताच मुसलमान समाज, आपले पहिले धर्मकर्तव्य कोणते समजतो, ते मुसलमानांनी हिंदूंपासून काही लपवून ठेवलेले नाही. आठवत नाही का, की जेव्हा मुसलमानांची सैन्ये प्रथमत:च पंजाब ओलांडून सौराष्ट्रापर्यंत भिडली, तेव्हा म्हणजे उण्यापुर्‍या एक सहस्र वर्षांपूर्वीच सुलतान महंमद गझनवी या इस्लामच्या सेनापतीने श्रीसोमनाथाची मूर्ती फोडताच शतकाशतकांच्या बोलघुमटातून प्रतिध्वनित जाईल इतक्या मोठ्याने राक्षसी गर्जना केली होती की, `मूर्तीपूजक म्हणून नव्हे तर मूर्तीध्वंसक-बुत्शिकन् असे म्हणवून घेण्यात मी धन्यता मानतो ! ही काफिरांची बुद्धप्रस्थी (मूर्तीपूजा) उखडून टाकण्याची प्रतिज्ञा करूनच मी या इस्लामी तख्तावर चढलो आहे !' त्या दिवसापासून तशाच पिसाळलेल्या प्रतिज्ञा करून सुलतानामागून सुलतान रामेश्‍वरपर्यंत युद्धाचा हलकल्लोळ माजवत गेले, हिंदूंच्या सहस्रावधी मूर्तींचे तोडून फोडून पीठ करून टाकले, देवस्थाने मातीत मिळवून दिली.'' सावरकर पुढे लिहितात, ``विनोबांच्या हट्टाग्रहाने पंढरपूरच्या हिंदूंनी अहिंदूंना विठ्ठल मंदिरात येऊ दिले. हे वृत्त ऐकताच मुसलमानांना मात्र तसा आग्रह करावयास कोणी विनोबा आला तर त्याची डाळ तेथे शिजायची नाही हे खडसावून सांगण्यासाठीच कि काय, त्याच आठवड्या-दोन आठवड्यांत कोल्हापूरच्या कित्येक मशिदींवर अशा लेखी सूचना फडकल्या की, `जे नमाज पढतात त्यांनाच काय तो मशिदीत प्रवेश मिळू शकतो !' ही मुसलमानी धमकी मात्र या `जयजगत्'वादी मंडळींनी अलगद गिळून टाकली. तोंडसुद्धा वाकडे केले नाही. इतकेच काय पण त्याच महिन्यात जेव्हा विनोबांना वाटेत असलेल्या एका दर्ग्यात जावेसे वाटले तेव्हा तेथील मुसलमान प्रमुखाने दटावले की, `या दर्ग्यात कोणी स्त्री येऊ शकत नाही. तुमच्या घोळक्यात आलेल्या या बायांना काढून टाका !' ती दटावणी होती मुसलमानांची ! अर्थात तिथे समतेचे वा मानवतावादाचे अवाक्षरही न काढता विनोबांनी त्यांच्या सहचारी मंडळीतील स्त्रियांना बाजूला काढले आणि दर्ग्यात जाऊन स्वत:स पावन करून घेतले ! अगदी आजही पाकिस्तानात सहस्रावधी हिंदू देवालयांचा केवढा भयंकर विध्वंस नि विटबंना होत आहे ! अर्थात जोवर मूर्तीभंजन हे इस्लामचे एक अपरिहार्य कर्तव्य होय. ही आमच्या मुसलमानांचीही अढळ निष्ठा आहे आणि त्या परस्परांच्या मनात धर्मशत्रुत्वाची सक्रीय भावना पेटलेली आहे तोवर गेल्या सहस्र वर्षांच्या वर उल्लेखलेल्या मुसलमानांच्या मूर्तीभंजक अत्याचारांची भयंकर आठवण विसरून हिंदूंनी आपल्या देवालयांतून त्याच मुसलमानांना मुक्‍तद्वार प्रवेशाचा, संचाराचा नि आचाराचा अधिकार द्यावा असे तुम्ही हिंदूंना कोणत्या तोंडाने सांगू शकता ?'' मुसलमान व ख्रिस्ती पंथियांनी हिंदूंच्या देवतांचा आणि मूर्तींचा त्यांना वाटणारा द्वेष कधीही लपवून ठेवलेला नाही. स्वा. सावरकरांचे हे विचार दुर्लक्षित केले, तर `हिंदूंच्या देवळात अहिंदूंना प्रवेश द्या !', अशी मागणी करायला हिंदू व त्यांची देवळेही शिल्लक रहाणार नाहीत !
( या लेखासाठी सहाय्य केल्या बद्दल स्वाती सारंग यांचे आभार )

No comments:

Post a Comment