Monday, June 21, 2010

स्वा. सावरकरांच्या कविता

ने मजसी ने परत ......
ने मजसी ने परत मातृभूमीलासागरा, प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूतामी नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशि चल जाऊसृष्टिची विविधता पाहूत‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झालेपरि तुवां वचन तिज दिधलेमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीनत्वरित या परत आणीनविश्वसलो या तव वचनी मीजगद्‌नुभवयोगे बनुनी मीतव अधिक शक्ती उद्धरणी मीयेईन त्वरे, कथुनि सोडिले तिजलासागरा, प्राण तळमळलाशुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीही फसगत झाली तैशीभूविरह कसा सतत साहु या पुढतीदशदिशा तमोमय होतीगुणसुमने मी वेचियली या भावेकी तिने सुगंधा घ्यावेजरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचाहा व्यर्थ भार विद्येचाती आम्रवृक्षवत्सलता, रेनवकुसुमयुता त्या सुलता, रेतो बाल गुलाबहि आता, रेफुलबाग मला, हाय, पारखा झालासागरा, प्राण तळमळलानभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारामज भरतभूमिचा ताराप्रासाद इथे भव्य, परी मज भारीआईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य, मज प्रिया साचावनवास तिच्या जरि वनिचाभुलविणे व्यर्थ हे आता, रेबहु जिवलग गमते चित्ता, रेतुज सरित्पते जी सरिता, रेत्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजलासागरा, प्राण तळमळलाया फेनमिषें हससि निर्दया कैसाका वचन भंगिसी ऐसा ?त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीतेभिउनि का आंग्लभूमीतेमन्मातेला अबला म्हणुनि फसवीसीमज विवासनाते देशीतरि आंग्लभूमी भयभीता, रेअबला न माझि ही माता, रेकथिल हे अगस्तिस आता, रेजो आचमनी एक क्षणी तुज प्यालासागरा, प्राण तळमळलासावरकर १९०९ ब्राईटन समुद्र किनारा


हिंदु नृसिंह
हिंदु नृसिंहहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजाहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजाहे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजाहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकरि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदनाकरि अंतःकरण तुज अभि-नंदनातव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदनागूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्याहे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।हा भग्न तट असे गडागडाचा आजीहा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धाराती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारागड कोट जंजिरे सारे । भंगलेजाहलीं राजधान्यांची । जंगलेंपरदास्य-पराभविं सारीं । मंगलेंया जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जाहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाजी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवीजी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवीजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवीजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवीती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु देती बुध्दि भाबडया जीवां । लाहु देती शक्ती शोणितामाजी । वाहु देदे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्याहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।




जयोस्त्तु तेजयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांचीस्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांचीपरवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशीस्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीस्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लालीतूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंचीस्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांतीस्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदतीजे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तेंस्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रतेतुजसाठिं मरण तें जननतुजविण जनन ते मरणतुज सकल चराचर शरणभरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदेस्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकरालाक्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आलाहोय आरसा अप्सरसांना सरसे करण्यालासुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुलाकोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीलाही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतांकां तुवां ढकलुनी दिधलीपूर्वीची ममता सरलीपरक्यांची दासी झालीजीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें देस्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।


अनादि मी अनंत मी.....

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भलामारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।अट्टाहास करित जईं धर्मधारणींमृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणींअग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितोभिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतोखुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मलानम्र दाससम चाटिल तो पदांगुलाकल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरीहटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावलीआण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तेंयंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकतेहलाहल । त्रिनेत्र तोमी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।




केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारलादुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला धृ.वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,हादरली धरणि व्योम शेषही शहारला १खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला २तुळजापुरची भवानी माय महान मंगला,राउळात आदमखान दैत्यासह पोचला,मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला 3श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले,देउनी बळी अदास तोशवी भवानीला ४सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ५केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला


केवळ हिंदू !


अश्रूंत मी, हास्यात मी, दास्यात मी,वेदांत मी, सिद्धांत मी, विश्वरुपी , ब्रम्हांड मी,दैन्य मी, चैतन्य मी, सत्य मी, आभास मी,पूजा कधी, निर्माल्य मी, धन्य मी, मांगल्य मीमाझ्याच शॊधात मी.., माझ्याच शॊधात मी...हिंदू हिंदू केवळ हिंदू !
माझे अवघे मी पण हिंदूआयुष्याचा कणकण हिंदू,ह्रदयामधले स्पंदन हिंदूतन-मन हिंदू, जीवन हिंदू !दरीदरीतिल वारे हिंदूआकाशातिल तारे हिंदू,इथली जमीन, माती हिंदूसागर, सरिता गाती हिंदू !धगधगणारी मशाल हिंदूआकाशाहुन विशाल हिंदू,सागरापरी अफाट हिंदूहिमालयाहुन विराट हिंदू !तलवारीचे पाते हिंदूमाणुसकीचे नाते हिंदू,अन्यायावर प्रहार हिंदूमानवतेचा विचार हिंदू !महिला, बालक, जवान हिंदूखेड्यामधला किसान हिंदू,शहरांमधुनी फिरतो हिंदूनसानसांतुन झरतो हिंदू !प्रत्येकाची भाषा हिंदूजात, धर्म अभिलाषा हिंदूतुकाराम अन कबीर हिंदूहरेक मस्जिद, मंदिर हिंदू !इथला हरेक मानव हिंदूअवघी जनता अभिनव हिंदू,झंझावाती वादळ हिंदूहिंदू हिंदू केवळ हिंदू !शंभर कोटी ह्रदये हिंदू,हजार कोटी स्वप्ने हिंदू,असंख्य, अगणित ज्वलंत हिंदूअखंड भारत, अनंत हिंदू





आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।




सावरकर यांनी शिवाजी महाराजांन वर लिहिलेली
सावरकर यांनी शिवाजी महाराजांन वर लिहिलेली आणि एकमेव आसलेली आरतीआरती शिवाजी महाराजांचीजयदेव जयदेव जय जय शिवराया !या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घालाआला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेलाकरुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षीदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता म्लेंच्छाही छळतातुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलोपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालोसाधु परित्राणाया दुष्कृती नाशायाभगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरलाकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरलादेशास्तव शिवनेरी घेई देहालादेशास्तव रायगडी ठेवी देहालादेशस्वातंत्र्याचा दाता जो झालाबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४

1 comment:

  1. माझे अवघे मीपण हिंदू ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची नसून श्री शतानंद पाटील यांची आहे.

    ReplyDelete